सातारा प्रतिनिधी | मनोज जरांगे पाटील हे सत्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्याकडून मराठा आरक्षणासाठी राज्यभर रान पेटवले जात असतानाच प्रशासकीय यंत्रणांकडून देखील कुणबी दाखले शोधण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबविली जात आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात नोंदी शोधण्यास प्रारंभ झाल्यापासून आजअखेर तब्बल १९ लाख १९ हजार ३१५ नोंदी तपासल्या आहेत. यापैकी ११ लाख २३ लाख ४५० या १९४८ पूर्वीच्या आहेत.
सातारा जिल्ह्यात सध्या महसूल, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कारागृह विभाग, पोलिस, सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, भूमिअभिलेख विभाग, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा वक्फ अधिकारी विभाग, जात प्रमाणपत्र पडताळणी विभाग तसेच सर्व आस्थापना नोंदी तपासणीच्या कामात गुंतल्या आहेत.
प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीतील तहसीलदारांना याबाबत कक्ष स्थापन करण्यास सांगितले. त्यानुसार जिल्ह्यात ११ तहसील कार्यालयांत कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात पुरावे संकलन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. याठिकाणी १८६६ पासूनच्या उपलब्ध नोंदी नों तपासल्या जात आहेत. या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षाकडे पाठवल्या जात आहेत. जुन्या नोंदी तपासण्याचे काम क्लिष्ट असून मोडी लिपीतज्ज्ञांची मदतही लागत आहे, तरीही हे आव्हान प्रशासनाने पेलले असून तपासलेल्या १९ लाख १९ हजार ३१५ नोंदीं नों पैदीं पैकी तब्बल ११ लाख २३ लाख ४५० नोंदी या १९४८ पूर्वीच्या आहेत, तर १९४८ ते १९६७ पर्यंत ७ लाख ९५ हजार ८६५ नोंदी तपासल्या आहेत.