सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड?; आता ‘या’ योजनेतून बँक खात्यावर 4 हजार रुपये जमा होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । वाढत्या महागाईमुळे यंदाची दिवाळी हि कशी साजरी करायची अशी चिंता सर्वांनाच लागून राहिली आहे. तशीच शेतात घाम गळणाऱ्या शेतकऱ्यांना देखील लागली आहे. मात्र, शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी हि शेतकऱ्यांना गोड जाणार आहे. कारण ग्रामीण भागातील बळीराजाला मदत होण्यास केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान तर राज्याने ‘नमो’ शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत वर्षाला १२ हजार मिळणार आहेत. यातील राज्याचा पहिला आणि केंद्राचा १५ वा हप्ता हा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 हजार जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे जर पैसे दिवाळीपूर्वी जमा झाल्यास याचा सातारा जिल्ह्यातील 4 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

देशातील लाखांहून अधिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. या अंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये हे तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जात आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांना १४ हप्ते देण्यात आलेले आहेत. यातून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागत आहे. त्याचबरोबर राज्य शासनानेही या वर्षीपासून “नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केलेली आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला सुद्धा केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घ्यायचा असेल तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi हे अँप डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून सर्व सरकारी योजनाना थेट अर्ज करून आर्थिक लाभ मिळवता येतोय. यासाठी तुम्हाला १ रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही. तसेच यामध्ये तुम्हाला जमीन मोजणी, हवामान अंदाज, सर्व पिकांचा बाजारभाव, पशूंची खरेदी विक्री, सर्व शासकीय योजनाना अर्ज, सातबारा उतारा, फेरफार उतारा यासारख्या सर्व सुविधा अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा.

दि. २६ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राज्याचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यातच केंद्र शासनही १५ वा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे. यामुळे दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा झाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी हे गॉड होणार हे नक्की!

आधार जोडणी नसणारे 34 हजारांवर

किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यासाठी बँक खात्याला आधार जोडणीही आवश्यक असते. असे असतानाही सातारा जिल्ह्यातील ३४ हजार ५१८ शेतकऱ्यांनी अजून आधार जोडणी केलेली नाही. पाटण तालुक्यातील सर्वाधिक ५ हजार ५७७ शेतकरी आधार जोडणीपासून दूर आहेत. तर कराड तालुक्यात ५ हजार १९९, खटावमध्ये ५ हजार १३, माण तालुक्यात ४ हजार १३ शेतकरी आहेत. तर महाबळेश्वर तालुक्यात सर्वात कमी ६२९ शेतकरी आहेत.

सातारा जिल्ह्यात 4 लाख 50 हजार लाभार्थी

केंद्र शासनाने ही योजना सुरु केली तेव्हा सातारा जिल्ह्यात ५ लाखाहून अधिक शेतकरी लाभार्थी होते. मात्र, त्यानंतर आयकर भरणारे, नोकरदार यांना वगळण्यात आल्यामुळे सध्या जिल्ह्यात ४ लाख ४५ हजार ७९८ लाभार्थी शेतकरी राहिले आहेत. त्यातील ४ लाख ११ हजार ७०० शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे.

KYC राहिलेले सर्वाधिक शेतकरी हे पाटणचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेस लागणारी कहाणी महत्वाची कागद पत्रे देणे आवश्यक असते. त्यामध्ये केवायसी यांच्याशी समावेश होतो. विशेष म्हणजे हि केवायसी कागदपत्रांची पूर्तता करण्यात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा कमी आहे. कारण या तालुक्यातील ६ हजार ७५० शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही. तर कराड तालुक्यात ४ हजार ८६४ शेतकरी, खटाव तालुक्यातील ४ हजार ९६० शेतकरी तसेच सर्वात कमी खंडाळा तालुक्यात ६५८ शेतकऱ्यांचा केवायसी पूर्ण न केलेल्यामध्ये समावेश आहे.