जिल्ह्यात 4 हजार ग्राहकांना नकोय नवीन वीजजोडणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । वीजबिल थकबाकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी संपूर्ण व्याज व विलंब आकार शुल्काची माफी असलेल्या महावितरण अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा फायदा घेत वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीला प्राधान्य देत ४ हजार ११४ ग्राहकांनी नवीन वीजजोडणी नको असली, तरी ५ हजार ५८३ ग्राहकांनी नवीन वीजजोडणीची मागणी केली आहे.

दि. ३१ मार्च २४ पर्यंत थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित थकबाकी झालेल्या जागा वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणने अभय योजना सुरु केली. या योजनेनुसार एकूण थकीत रकमेतील व्याज व विलंब आकाराची संपूर्ण १०० टक्के रक्कम माफ होणार आहे व केवळ मूळ थकबाकीचाच भरणा करावा लागणार आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही अभय योजना आहे.

विशेष म्हणजे केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सूट मिळत आहे. किंवा मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरुन उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. ही योजना दि. १ सप्टेंबर ते दि. ३० नोव्हेंबरपर्यंत आहे.

प. महाराष्ट्रातील ९ हजार ६९८ ग्राहकांचा सहभाग

पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ९ हजार ६९८ ग्राहकांनी अभय योजनेत सहभाग नोंदवला आहे. यात पुणे जिल्हा ४६१७, सातारा ४५५, सोलापूर १४३९, कोल्हापूर ११०२ आणि सांगली जिल्ह्यातील २०८५ थकबाकीदारांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. या ग्राहकांनी मूळ थकबाकी भरल्यास व्याज व विलंब आकार शुल्काचे संपूर्ण ३ कोटी २४ लाख रुपये माफ होणार आहेत.