वाईतील जबरी चोरी प्रकरणी मुद्देमालासह 4 संशयितांना अटक

0
785
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील वाई येथील सराफ बाजारातील सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यातील कामगारांना पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी वाई पोलिसांनी 4 जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ४ लाख १५ हजार १५२ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

अनुज गंगाराम चौगुले (वय ३६), रॉय ऊर्फ रॉयल एडव्हर्ड सिक्वेरा (वय ५०, दोघे रा. नालासोपारा, वसई-विरार), तसेच सुधीर गणपत शिंदे (वय ५६ रा. गंगापुरी, वाई) आणि सीताराम विठ्ठल चोरट (वय ५०, मूळ गाव कोंढवली, ता. महाबळेश्वर) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की येथील सराफ बाजारातील सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यातील कामगारांना २८ जुलै २०२४ मध्ये पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवून जबरी करण्यात आली होती. याबाबत संजय माइती याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. वसई-विरार पोलिसांनी अशाच एका दरोड्याच्या गुन्ह्यात अनुज चौगुले व रॉय ऊर्फ रॉयल एडव्हर्ड यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी वाई येथे जबरी चोरीचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर या दोन्ही आरोपींचा वाई पोलिसांनी ताबा घेऊन त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

या गुन्ह्यात वाईतील सुधीर शिंदे व सीताराम चोरट यांनी मदत केल्याचे त्यांनी सांगितले. या दोघांनी त्यांना शहरातील ज्वेलरी परिसर, तसेच संजय व मृत्युंजय माइती यांचे सोन्याचांदीच्या दागिने बनविण्याचे दोन कारखाने दाखवले, तर चोरट याने वाईमध्ये येणारे व जाणारे संपूर्ण रस्ते दाखवून सीसीटीव्हीमध्ये न येता कोणत्या रस्त्याचा वापर करायचा याची संपूर्ण माहिती पुरविली. त्यानंतर चौघांनी एकत्र येऊन रात्री उशिरा चोरीचा कट रचला. अनुज चौगुले व रॉयल ऊर्फ रॉय एडव्हर्ड सिक्वेरा यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी स्वारगेट येथून चोरी केली.

चोरी केल्यानंतर दोघेही दुचाकीने पुणे बाजूकडून भोरमार्गे महाडला निघून गेले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल नागोठणे येथे बेवारस स्थितीत मिळून आली. त्यांनी चोरलेले दागिने कोईम्बतूर (तमिळनाडू) आणि वसई येथे विकले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न आले. त्यानंतर आरोपींची १० दिवसांची पोलिस कोठडी घेऊन पोलिसांनी कोईम्बतूर (तमिळनाडू) व वसई येथे जाऊन या गुन्ह्यातील चार लाख १५ हजार १५२ रुपये किमतीचे एकूण ५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज करीत आहेत.