पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडीत 4 गाड्यांचा विचित्र अपघात; एकामागून एक येत…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सद्या मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नुकताच पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील खिंडवाडी येथे नुकताच 4 गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की. पुणे: बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा जवळील खिंडवाडी येथे पुण्याहून कोल्हापूरकडे जाणा-या उतारावर शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास 4 गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात चारजण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात‌ दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

या अपघातात एकामागून एक पाठीमागून धडक दिलेल्या कारचा पुढ आणि पाठीमागील भाग पूर्ण चक्काचूर झाला आहे तर एका टेम्पोचीही धडक झाली असून त्याचाही पुढच्या भागाचे नुकसान झाले. अपघाताच्या घटनेची पोलीसाकडून चौकशी केली जात आहे.