जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेचे ‘इतके’ लाख शेतकरी लाभार्थी; मात्र, घरात एकालाच मिळणार पैसे

0
2785
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत DBT, थेट लाभार्थी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येते. शेतकर्‍यांच्या खात्यात दर चार महिन्याला 3 हप्त्यात दोन हजार रुपये जमा करण्यात येतात. सध्या या योजनेत एकूण 18 हप्ते जमा करण्यात आले आहे. तर आता शेतकर्‍यांना 19 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. त्यातच सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे.

त्याप्रमाणे यापुढे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभारती असणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कारण, केंद्र सरकारने नियमावली लागू केली असून कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच लाभ मिळेल. तर जिल्ह्यात सध्या सुमारे साडे चार लाख लाभार्थी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी च्या शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, या हेतूने वर्षाला सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. ही मदत तीन हप्त्यात मिळत आहे. त्यानुसार योजनेची सुरुवात डिसेंबर २०१८ मध्ये करण्यात आली. सातारा जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेचे एकूण ४ लाख ४६ हजार ३५४ शेतकरी लाभार्थी आहेत. आता नव्या नियमानुसार अनेकजण या योजनेतून बाद होऊ शकतात.

2019 पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना मिळणार लाभ

लाभार्थीच्च्या नावावर २०१९ पूर्वी जमिनीची नोंद असावी. लाभार्थीच्या नावावर २०१९ नंतर वारसा हक्काने जमीन नोंद झाल्यास लाभ मिळणार आहे. कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, 3 मुलगी यापैकी एकच व्यक्ती आता योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

यांना लाभ मिळणार नाही…

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. मात्र, सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार नवीन २०१९ नंतर जमीन खरेदी असेल, तीन किंवा दोन वर्षे आयकर भरला असेल तर १०,००० पेक्षा अधिक पेन्शन असल्यास या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

योजनेसाठी पात्र शेतकरी

जावळी : २४,८९५
कराड : ७०,८५०
खंडाळा : १९,७७९
खटाव: ५१,०५०
कोरेगाव : ४१,९०९
महाबळेश्वर : ७,०५५
माण : ४६,०३३
पाटण : ५६,२३७
फलटण : ४९,८८३
सातारा : ४९,५३४
वाई : २९,१२९

असे करा eKYC

  • ओटीपी आधारे करा ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल ऐपवर उपलब्ध)
  • बायोमेट्रिक आधारे ई-केवायसी तुम्ही CSC Center/ SSK वरुन करु शकता
  • फेस ऑथेंटिकेशन ई-केवायसी, मोबाईल ऐपवर उपलब्ध आहे.