साताऱ्यातील ‘इतके’ वसुली विभागाच्या रडारवर; 5 लाखांहून अधिक आहे थकबाकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | आवाहन करुनही कर भरणा न करणाऱ्या मिळकतदारांवर पालिकेच्या वसुली विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. 5 लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या शहरातील 30 मिळकदारांना जप्तीची नोटीस बजावण्यात आली.

मालमत्ता कर, पाणी कर, स्वच्छता कर, अग्निशमन कर, विकास कर आदी प्रकारचे कर पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. या करातूनच नागरिकांना पायाभूत सेवा-सुविधा पुरविल्या जातात. शहरातील बहुतांश मिळकतदार मालमत्ता व पाणीकर वेळेत जमा करतात. मात्र, काही मिळकतदार कर भरण्यास टाळाटाळ करतात. अशा मिळकतदारांना कारवाईला सामोरे जावे लागते. पालिकेला यंदा पाणीपट्टी व घरपट्टीचे मिळून ३८ कोटी ४१ लाख रुपये वसूल करावयाचे आहेत.

यापैकी पालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत २२ कोटींचा महसूल जमा झाला असून, येत्या महिनाभरात आणखी १६ काेटी ४१ लाखांचे उद्दिष्ठ गाठावयाचे आहे. हे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी पालिकेने शहरातील ४ हजार मिळकतदारांना नोटीस बजावून कर भरण्याचे आवाहन केले आहे. तर पाच लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या ३० मिळकतदारांना जप्तीची नोटीस बजावली आहे.