जिल्ह्यात 34 हजार आजोबा अन् आजी करणार घरातून मतदान; 12 डी फॉर्म भरण्याची प्रक्रिया साताऱ्यात सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीची तयारी सुरू आहे.आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक सुरू असताना ज्येष्ठ मतदारांना घरातूनच मतदान (होम वोटिंग) करण्याचा अधिकार भारतीय निवडणूक आयोगाने दिलेला आहे. यासाठी १२ डी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असून ८५ पेक्षा जास्त वय असणारे ३४ हजार ८०० ज्येष्ठ नागरिक घरातून मतदान करू शकणार आहेत.

सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून आठही विधानसभा मतदारसंघांमधील इच्छुकांनी मोर्चा बांधणी सुरू केली आहे. यामध्ये ज्येष्ठ मतदान ज्यांचे वय ८५ वयापेक्षा जास्त आहेत. जे दिव्यांग आहेत त्यांना निवडणूक आयोगामार्फत होम वोटिंग म्हणजे घरातूनच मतदान करण्याचा हक्क दिलेला आहे. याचा जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये फलटण ४८५१, वाई ४०७९, कोरेगाव ४१०६, माण ५५९८, कराड उत्तर ४०९४, कराड दक्षिण ३५२३, पाटण ४१७४, सातारा ४३७५ असे एकूण जिल्ह्यात ३४८०० ज्येष्ठ मतदार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदार यांना मतदान करण्यासाठी केंद्रावर जायचे आहे. तुमच्यासाठी वाहनांची तसेच मदतनीसांची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.