केंद्र सरकारकडून इको सेन्सेटिव्ह गावांची घोषणा; जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांतील 336 गावांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | नुकतीच संवेदनशील म्हणजे इको सेन्सेटिव्ह गावांची घोषणा नुकतीच केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. यामध्ये जाहीर केलेल्या क्षेत्रात जिल्ह्यातील सातारा, जावली, महाबळेश्वर, वाई, कोरेगाव तसेच पाटण तालुक्यातील 336 गावांचा समावेश केला आहे.

पश्चिम घाटाला पर्यावरणदृष्ट्या घोषित करण्यासाठीचा पाचवा मसुदा केंद्र सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील 17 हजार 340 चौ. कि. मी. क्षेत्र संवेदनशील म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित आहे. यापूर्वी 2022 साली जाहीर केलेल्या मसुद्यानुसार सातारा, महाबळेश्वर, जावली आणि पाटण तालुक्यातील बर्‍याच गावांचा त्यामध्ये समावेश होता. त्यातील काही गावे वगळण्याची मागणी होती. या तालुक्यांमध्ये पर्यटन प्रकल्प प्रस्तावित आहेत.
जिल्ह्यात 336 गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याचे जाहीर केले आहे.

इकोसेन्सेटीव्ह गावांमध्ये विकासावर मर्यादा येणार असल्या तरी पर्यावरणाचा बचाव होण्यास मदत होणार आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेस असलेल्या घाट क्षेत्राचे सर्वेक्षण केल्यास आणखी काही गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून सापडू शकतात. पश्चिम घाटातील जैवविविधता व पर्यावरण टिकून राहण्यासाठी या भागात बड्या धेंडाचा सुरू असलेल्या उपद्व्यापाला आळा घालणे आवश्यक आहे, अशा प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

जावली अन् कोरेगाव तालुक्यातील ‘इतक्या’ गावांचा समावेश

जावली तालुक्यातील अडोशी, आगलवेवाडी, अंधारी, आपटी, बेलवडे, भालेघर, भोगवली तर्फ मेढा, भुतेघर, बोंडारवाडी, हिम्मत बु॥, देऊर, धनकवडी, दिवदेव, दूंद, फ्युरस, गाळदेव, गांजे, गोंडेमाळ, हातेघर, जांब्रुक, जरेवाडी, जुंगटी, काळोशी, करंडी तर्फ मेढा, कारगाव, कास, कसबे बामणोली, केळघर तर्फ सोळशी, खिरखंडी, कोळघर, कुंभारगनी, कुरळोशी, कुसापूर, कुसवडे, कुसंबी, मदोशी, मजारे शेवंडी, मालचौंडी, मालदेव, मार्लेश्वर, मामुर्डी, मरडमुरे, शेंबडी, मेट इंदवली, मेट शिंदी, महामुलकरवाडी, म्हाते खुर्द, म्हावशी, मोहट, मोरावळे, नर्फदेव, निपाणी, निजरे, ओखवाडी, पाली तर्फ तांब, फळणी, पिंपरी तर्फ मेढा, रंगघर, रवंडी, सह्याद्रीनगर, सांगवी तर्फ मेढा, सावरी, सावरत, सायली, रूईघर, सोनगाव, ताकवली, तांबी, तांबी तर्फ मेढा, तेटली, उंबरेवाडी, वडगरे, वाघेश्वर, वाहिते, वळंजवाडी, वासोटा, वेळे, वाघळी, वाकी, येकीव या गावांचा समावेश आहे. तर कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी, राऊतवाडी ही गावेही समाविष्ट करण्यात आली आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील ‘या’ गावाचा समावेश…

महाबळेश्वर तालुक्यातील अचळी, अहिरे, आकल्पे, अमशी, अराव, अवकाळी, अवळान, भेकवली, बिरमनी, बिरवडी, चकदेव, चतुरबेट, चिखली, दाभे दाभेकर, दाभे मोहन, दाभे तुरूक, हिंमत, देवली, देवसरे, धारदेव, दोडानी, दूधगाव, दुधोशी, गाढवली, गावढोशी, घावरी, घोणसपूर, गोरोशी, हरचंडी, हरोशी, हातलोट, जावली, कळमगाव, कळगाव कळमकर, कंडत, खांबिल चोरगे, खांबिल पोकळे, खरोशी, कोटरोशी, क्षेत्र महाबळेश्वर, कुंभरोशी, कुमठे, करोशी, लखवाड, लामज, महाबळेश्वर (एमसीएल), माजरेवाडी, मालूसर, मांघर, मेट तळिये, मेटगुताड, म्हाळुंगे, मोरणी, नाकिंदा, नवली, निवळी, पाली तर्फ आतेगाव, पारपर, पारसोंड, पारूत, पर्वत तर्फ वागावळे, पेटपार, पिंपरी तर्फ तांब, रण अदवा गौंड, रेनोशी, रुळे, सोळशी, शिंदी, शिंडोला, शिरावली, शिरनार, सोनत, उंडरी, तळदेव, टेकवली, उचाट, उंबरी, वलवण, वर्सोली कोळी, वेंगळे, विवर, वळणे, येरंडल, येरणे बु॥, येरणे खुर्द, झाडाणी, जांजवाड या गावांचाही समावेश करण्यात आला आहे.

महाबळेश्वरातील ‘झाडाणी’चाही समावेश

झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे गाव बड्या अधिकार्‍याच्या भूखंड खरेदीमुळे प्रचंड चर्चेत आले. नवे महाबळेश्वर प्रकल्पात असलेल्या झाडाणीचा समावेश इकोसेन्सेटिव्ह गावांमध्ये झाला आहे.