कराड तालुक्यातील 32 शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने कराड तालुक्यातील 32 शिक्षकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गुरुवारी सन्मानित करण्यात आले. यावेळी आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार तसेच आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचेही वितरण करण्यात आले.

कराड पंचायत समितीच्या बचत भवन येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात गुरुवारी हा पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी जि.प. सदस्य उदयसिंह पाटील, प्रदीप पाटील, उत्तम पाटील, कराड पंचायत समिती गटविकास अधिकारी मीना साळुंखे, प्रमुख वक्ते युवराज पाटील, कराड पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी सन्मती देशमाने, शिक्षण विस्तार अधिकारी जमिना मुलाणी यांच्यासह केंद्रप्रमुख, पुरस्कार प्राप्त शिक्षक, तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुढील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 1) पुजा उदय भंडारे (उंब्रज मुले), 2) दादा खंडू रावते (मरळी), 3) आबा राजाराम शिरतोडे (आकाईवाडी), 4) रामकृष्ण यशवंत थोरात (तुळसण), 5 सुप्रिया सुनिल काळोलीकर (काले मुली), 6) अरुणा राजेंद्र खंदारे (यशवंतनगर), 7) गीता महादेवराव गावडा (तारुख), 8) सदानंद नानासो साबळे (शरदनगर), 9) योगेश संभाजी माने (आनंदपूर- अंधारवाडी), 10) सचिन सिताराम कुंभार (घोलपवाडी), 11) राजेश तुकाराम मोरे (किरपे), 12) शिवांजली प्रल्हाद साळुंखे (शिरगाव), 13) वैशाली हरिचंद्र माने (करवडी), 14) संतोष किसन बाबर (शिंदेमळा), 15) मनोजकुमार चंद्रकांत कुलकर्णी (वाघेश्वर), 16) यशवंत नामदेव कांबळे (गणेशवाडी), 17) भास्करराव शिवाजी चव्हाण (म्हासोली), 18) सुनिता सूर्यकांत शिंदे (रेठरे बु मुली), 19) सविता दिलीप कुंभार (शेणोली मुली), 20) सुरेश शंकर तेली (खोडशी), 21) आनंदा गोविंदा कोळेकर (वाठार), 22) आनंद रघुनाथ गायकवाड (येरवळे नं-1), 23) रविंद्र यशवंत डवरी (विजयनगर), 24) ज्योती बसवेश्वर चेणगे (पाडळी), 25) विलास दत्तात्रय घावटे (चिखली), 26) युवराज शैलेन्द्र वळवके (दुशेरे), 27) धनाजी प्रल्हाद कोळी (चैनीमळा), 28) सरिता राजेश पाटील (जुने पोतले), 29) संध्या सचिन चव्हाण (कोर्टी), 30) शहनाज अकबर शेख (वाघेरी – उर्दू), 31) युवराज बकाराम बागुल (सैदापूर), निवास अंतू पवार (तांबवे- केंद्रप्रमुख)

यावेळी प्रमुख वक्ते युवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमधून प्रातिनिधीक स्वरूपात वाठार शालेचे शिक्षक आनंदा कोळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन वैशाली शेकडे आणि अनंत- आघात यांनी केले. गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने यांनी प्रास्ताविक केले. केंद्रप्रमुख मधुसुदन सोनवणे यांनी आभार मानले.