सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यात 31 ग्रामपंचायती बिनविरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये जिल्ह्यातील ६ तालुक्यातील तब्बल ३१ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, जावळी, कोरेगाव, खटाव, वाई आणि माण या तालुक्यातील एकूण ३१ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून या गावातील विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. काल बिनविरोधाची घोषणा होताच जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या केंद्रांबाहेर येत अनेकांनी गुलालाची उधळण देखील केली.

दरम्यान, कराड तालुक्यातील करंजोशी, सावरघर, यशवंतनगर, बाबरमाची- डिचोली या ४ तर पाटण तालुक्यातील गमेवाडी, गुंजाळी, नवसरवाडी, डावरी, उधवणे, गव्हाणवाडी, चौगुलेवाडी (सांगवड) व येराडवाडी या ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड, शिरढोण, बोबडेवाडी, बोरीव, चवणेश्वर, चोरगेवाडी, कोंबडवाडी, मुगाव या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

खटाव तालुक्यातील कामथी तर्फ परळी, पोफळकरवाडी, उंबरमळे, पांगरखेल आणि फतरडवाडी (बुध) आणि माण तालुक्यात सत्रेवाडी, वाई तालुक्यातील कोंढावळे, वडोली, भिवडी पुनर्वसन, धोम पुनर्वसन चांदवाडी आदी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.