कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी शेवटच्या दिवसा अखेर कराड उत्तरमधून २८ उमेदवारांनी ३१ तर दक्षिणमधून २२ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी अर्जाची छाननी असून उमेदवारी अर्ज माघारीची मुदत ४ नोव्हेंबर पर्यंत आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसा अखेर २८ उमेदवारांनी ३१ अर्ज दाखल केले आहेत.
सोमवार अखेर या मतदार संघात १६ उमेदवारांनी १९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी शेवटच्या दिवशी १२ उमेदवारांनी १२ अर्ज दाखल केले. त्यामुळे एकूण २८ उमेदवारांनी ३१ अर्ज दाखल केले आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात एकूण २२ उमेदवारांनी होणार आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी सोमवार दि. २८ अखेर १३ उमेदवारांनी १६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी शेवटच्या दिवशी ९ उमेदवारांनी १२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आज अखेर एकूण २२ उमेदवारांनी २८ उमेदवारी अर्ज २८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जाची छाननी दिनांक ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी सोमवार दि. २८ अखेर १३ उमेदवारांनी १६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी शेवटच्या दिवशी ९ उमेदवारांनी १२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आज अखेर एकूण २२ उमेदवारांनी २८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, नायब तहसीलदार हेमंत बेसके यांनी दिली.
अतुल म्हेत्रे यांनी सांगितले की, २९ ऑक्टोबर अखेर २२ उमेदवारांनी २८ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून २ उमेदवार, राष्ट्रीय काँग्रेसचे १, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया १, वंचित बहुजन आघाडी कडून १, बहुजन समाज पार्टी कडून १, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १ व अपक्ष उमेदवार १५ उमेदवार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. दाखल नामनिर्देशन पत्राची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, कराड येथे दिनांक ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता होणार आहे. दरम्यान प्रशासनाकडून मतदार जागृतीचे कार्यक्रम राबविले जात आहेत.
येथे होणार उमेदवारी अर्जाची छाननी
बुधवार दि. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. कराड उत्तरची छाननी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये होणार आहे. तर दक्षिणची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला येथे होणार आहे. अर्ज माघारीची मुदत ४ नोव्हेंबर असून मतदान २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे