सातारा विभागातील 11 आगारांतील सुमारे 300 बसेस कालबाह्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ग्रामीण भागातील गरिबांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी लालपरीची (एसटी) समस्या बिकट झाली आहे. एसटी महामंडळाच्या सातारा विभागातील 11 आगारांतील सुमारे 300 बसेस कालबाह्य झाल्या आहेत. या बसेसनी सुमारे 10 वर्षांची वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे कालबाह्य बसेस कुठेही बंद पडत असल्याने प्रकाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

एसटीची संख्या कमी असली, तरी एसटीने विविध सवलतींचा वर्षाव सुरू केला आहे. त्यामुळे एसटीकडे मोठय़ा संख्येने प्रकासी आकर्षित झाला आहे. दिवसेंदिवस एसटीकडे प्रवाशांचा ओढा वाढू लागला आहे. त्यामुळे तोटय़ात गेलेली एसटी आता विविध सवलतींमुळे फायद्यात येऊ लागली आहे. परंतु जुन्या व कालबाह्य झालेल्या बसेस कुठेही बंद पडू लागल्या आहेत.

अस्वच्छ, नादुरुस्त व गळक्या बसेस रस्त्यावर धावताना दिसत आहेत. जिह्यातील ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या मार्गावरती जुन्या बस धावत आहेत. त्यामुळे वाढलेल्या प्रवाशांचा भार सोसताना एसटीची दमछाक होताना दिसत आहे.

सातारा विभागात सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, मेढा, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, दहीवडी, वडूज या 11 आगारांत 686 एसटीच्या बसेस आहेत. त्यापैकी 30 बसेस बंद अवस्थेत आहेत. त्यातच आता उपलब्ध असलेल्या 686 बसेसपैकी 300 बस या दहा वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत. तर, दररोज 650 बसेस विविध मार्गांवर धावताना दिसत आहेत.

प्रवाशांच्या तुलनेत सातारा विभागात बसेस कमी असल्या, तरी जास्तीत जास्त प्रकासी वाहतुकीवर अधिकारी व कर्मचाऱयांनी भर दिला आहे. सातारा विभागात नवीन 26 बसेस दाखल झाल्या असून, त्यापैकी सातारा आगारात 16, तर कराड व पाटण आगारास प्रत्येकी 10 बसेस दिल्या असून, या नवीन बसेस स्वारगेट मार्गावर धावत आहेत.