‘वयोश्री’ अंतर्गत ज्येष्ठांना साधने, उपकरणासाठी मिळणार 3 हजार रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । ६५ वर्षांवरील किंवात्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य करण्यासाठी शासनाने राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी शासनाकडून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

शासनाकडून वयोश्री’ योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यातून पात्र वृद्धांना साहाय्य साधने-उपकरणे खरेदी करता येतील. तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे मानसिक स्वास्थ्यासाठी एकवेळ एकरकमी ३००० रुपये लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट जमा होतील.

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’ साठी जेष्ठ नागरीकांनी अर्ज करावा : नितीन उबाळे

‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ या योजनेतील लाभार्थ्याला ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा, आजारपण यावर उपाययोजनांसाठी आवश्यक साहित्य व उपकरणे खरेदीसाठी एकरकमी ३ हजार रुपये थेट बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी जेष्ठ नागरिकांनी समाज कल्याण विभागाकडे अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्य्क आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहेत.

काय आहे ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’?

६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, दुर्बलता याकरिता साधने, उपकरणे खरेदीकरिता साहाय्य, मानसिक स्वास्थ्यासाठी राज्य सरकारने “मुख्यमंत्री वयोश्री योजना” जाहीर केली आहे.

कोण आहे पात्र?

ज्या व्यक्तीचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक आहे, असे ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र धरले जाणार आहेत. या लाभार्थीना ३००० रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे. -त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागेल.

काय लाभ मिळतो?

या योजनेअंतर्गत पात्र वृद्धांना एकरकमी ३ हजार रुपये मिळणार आहेत. यातून त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार साहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतात.

कागदपत्रे काय लागतात?

आधारकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयं-घोषणापत्र, शासनाने ओळख पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे ड.

योजनेचा अर्ज कसा करावा-

१) या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला या मोबाईल ॲप्लिकेशनचा इन्स्टॉल करणे गरजेचे आहे.
२) त्यासाठी आपल्याला प्ले स्टोर वर जायचे आहे व प्ले स्टोर वर “ALIMCO Mitra” असे टाईप करायचे आहे.
३) आता एप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन बटन वर क्लिक करायचे आहे.
४) आता आपल्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल त्यात आपल्याला आपली सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरायची आहे जसे की आपले नाव, वडिलांचे नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, राज्य, जिल्हा, पत्ता.
५) आता आपल्याला रजिस्टर या बटनवर क्लिक करायचे आहे.
६) वरती दिलेली सर्व कागदपत्रे आपल्याला याबरोबर अपलोड करायचे आहेत.
७) खाली एक कॅपचा असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
८) अशाप्रकारे आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आता आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
९) अतिशय सोप्या पद्धतीने घरबसल्या आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.