सातारा प्रतिनिधी । सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने राधिका रोडवरील 3 टपर्या जप्त केल्या. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या आदेशानंतर अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी ही कारवाई केली. सातारा शहरातील मुख्य मार्ग व चौकांमध्ये बंद टपर्या, खोकी तसेच हातगाडे यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच अवैध धंदेही वाढल्याने कारवाई करावी, अशी नागरिकांनी नगरपालिकेकडे मागणी केली होती. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन अतिक्रमण हटाव विभागाला कारवाईचे आदेश दिले होते. या विभागाने मंगळवारी राधिका रोडवर कारवाई करून 3 टपर्या जप्त केल्या.
बंद खोकी, टपर्या व हातगाड्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या सुचनेनुसार 10 कर्मचार्यांनी डंपर, टिपरच्या मदतीने ही कारवाई केली.