निरा-बारामती रस्त्यावर ट्रॅकर-दुचाकीच्या अपघातात 3 जण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । निरा-बारामती रस्त्यावर निबुत नजीक लक्ष्मीनगर येथे ऊसाचा ट्रॅकर व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील 3 जण गंभीर जखमी झाले.

सुजल अशोक पवार (वय १४), करण राजू जाधव (वय २५) व कार्तिक कारण जाधव (वय ४, तिघे रा.लोणंद ता. खंडाळा ) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद ता. खंडाळा येथील तीन जण येथील तीन जण दुचाकी क्रमांक (MH 14 DG 7353) वरून निरेकडून बारामतीच्या दिशेला जात असताना त्याच वेळी ऊसाने भरलेला ट्रॅकर क्र. (MH 11 L 4207) हा देखील निरेकडून सोमेश्वर कारखान्याच्या दिशेने निघाला असता या दोन वाहनात अपघात झाला.

यामध्ये सुजल अशोक पवार वय १४, करण राजू जाधव वय २५ व कार्तिक कारण जाधव वय ४, तिघे राहणार लोणंद ता. खंडाळा हे जखमी झाले आहेत. जखमींना वाघळवाडी व निरा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास करंजेपुल पोलीस करत आहेत.