विधानसभा निवडणुकीसाठी माणमध्ये 3 लाख 60 हजार 662 मतदार मतदानाचा हक्क बजावणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या, दि. 20 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवारी निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी इव्हिएम मशीन व साहित्यासह नेमून दिलेल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले. या निवडणुकीत माण-खटाव मतदारसंघात एकूण तीन लाख 60 हजार 662 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदारसंघातील 21 उमेदवारांचे भवितव्य मतदारराजा ठरवणार आहे. मतदारसंघातील 388 मतदान केंद्रांवर 2639 कर्मचारी व 33 क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विकास अहिर, तहसीलदार बाई माने, मयूर भुजबळ, वैभव लिंगे, इंगळे रावसाहेब, महेश गायकवाड, लक्ष्मण पिसे मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत.

132 वाहने सज्ज…

माण-खटाव मतदारसंघातील मतदान प्रक्रियेत साहित्य व कर्मचार्‍यांच्या वाहतुकीसाठी 59 एसटी बसेस, 40 खासगी वाहने, 33 क्षेत्रीय अधिकार्‍यांची वाहने, अशी एकूण 132 वाहने प्रशासनाच्या दिमतीला आहेत.