सातारा प्रतिनिधी | मालचौंडी ता. जावली आणि परिसरात बिबट्या आणि त्याच्या दोन पिल्लांचा रात्रीच्या सुमारास गावातून मुक्त संचार असल्याचे दिसून आले आहे. या बिबट्याने आतापर्यंत गावातील तीन पाळीव कुत्र्यांचा फाडशा पाडला असून विभागात भितीचे आहे तर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
बिबटयाच्या मुक्त संचारा दरम्यान बिबट्याने हल्ला केलेली तिन्ही पाळीव कुत्रे मृत्युमुखी पडलेली असून आहेत. तसेच बऱ्याच जनावरांच्या गोठ्यामधील जनावरांवर सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे. बिबट्याच्या आणि पिल्लांच्या या मुक्त संचाराने गावकरी पूर्ण धास्तावले असून त्याच्या या दहशतीमुळे गांवामध्ये व आजुबाजुच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थ शेत, शिवारात जाण्यास धजावत नाहीत. बिबट्या आणि त्याच्या दोन पिल्लांचा वन विभागाने काहीतरी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून व पंचक्रोशीतून होत आहे. वारंवार तक्रार देऊनही वनविभाग याच्याकडे कानाडोळा केला जात आहे जात आहे. बिबट्या कडून काही अनुचीत प्रकार घडण्याच्या अगोदर वनविभागाने तत्परतेने लक्ष घालून बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे आहे, अशी मागणी जनतेतून होत आहे.