सातारा जिल्ह्यात ‘इतकी’ टक्के खरिपाची पेरणी; शेतकरी झाला चिंताग्रस्त

0
253
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकरीचयाचे करीत हंगामातील पेरणीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. पेरणीसाठी शेतीची मशागत करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यावर पावसाचे संकट ओढवले. सततच्या पावसामुळे शेतकऱ्याकडून जिल्ह्यात जास्त पेरमानात खरीप हंगामातील पेरणी देखील करता आलेली नाही. सातारा जिल्ह्यात खरीप हंगामाचे 3 लाख 96 हजार 392 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी प्रत्यक्ष 1 लाख 13 हजार 347 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून त्यांचे प्रमाण 28.59 टक्के आहे. सततच्या पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीसह पेरणीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

सातारा जिल्ह्यात यंदा पाऊस लवकरच बरसला. ज्या महिन्यात कडक उन्ह असते त्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पेरणीपूर्व मशागतीच्या वेळेतच पावसाने सुरुवात केल्यामुळे ठिकठिकाणच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतीला वाफसा न आल्याने मशागतीसह पेरणीची कामे रखडली. शेतकर्‍यांनी बँका, पतसंस्था, सोसायट्यांच्या माध्यमातून बि-बियाणे खरेदीसाठी कर्ज घेतले. मात्र, खरेदी केलेले बियाणे पाऊस असल्याने पेरता येईना. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यात पडणार्‍या वळवाच्या पावसावर शेतकरी खरीपपूर्व मशागतीची कामे उरकून घेतो. नांगरणी, वखरणी करून शेती पेरणीसाठी तयार केली जाते. मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला मान्सून दाखल झाल्यावर मिळणार्‍या उघडिपीच्या काळात पेरण्यांची लगबग सुरू होते. मात्र, यंदा निसर्गाचे चक्रच बदलले आहे. 10 मेपासून सुरू झालेल्या पावसाने सुरुवातीला अधूनमधून हजेरी लावली, ज्यामुळे शेतात ओल निर्माण होऊन मशागत करणे अशक्य झाले.पाऊस काही दिवसांनी विश्रांती घेईल, या अपेक्षेवर असलेल्या शेतकर्‍यांचा अंदाज पूर्णपणे फोल ठरला. मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत पावसाने अक्षरशः झोडपून काढले आणि तेव्हापासून आजतागायत त्याने उघडीप दिलेलीच नाही. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे.