कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटणला गेला आठवडाभरापासून मुसळधार पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. या पावसामुळे शेती, घरे, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशीआलेली पिके नाहीशी होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोयना धरणातून पाणी सोडले जात असून धारण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात देखील वाढ होत आहे. धरणातून सोडल्या जात असलेल्या पाण्यामुळे निकटच्या गावात पुराची स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून पूर बाधित २७ गावाची भेट देऊन सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे. परिणामी रात्रीत नदीपात्राची पाणी पातळी वाढल्यास काय होणार? या भीतीने अनेक कुटुंबावर स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे.
कराड तालुक्यातील नदीकाठच्या ७७ गावांवर पुराचे सावट असून पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कराड तालुक्यात कृष्णा आणि कोयना नदीकाठांवर शेकडो गावे वसली आहेत. त्यापैकी अनेक गावांना प्रत्येकवेळी पुराचा फटका बसतो. मात्र, वारंवार घोषणा होऊनही या गावांमध्ये सुरक्षात्मक उपाययोजना झालेल्या नाहीत.
केवळ पावसाळ्यात संरक्षक भिंतीसह पुनर्वसनाच्या घोषणा केल्या जातात. आणि पावसाबरोबर पूर ओसरताच या घोषणांचाही प्रशासनाला विसर पडत आहे. नदीकाठी वसलेल्या गावांमध्ये पावसाळा सुरू होताच पुराची धास्ती निर्माण होते. गतवेळी सलग दोन वर्षे आलेल्या पुराच्या कटू आठवणी संबंधित गावांमध्ये आजही ताज्या आहेत.
घरांच्या पडझडीचे स्तर सुरूच
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने कराड -पाटण तालुक्यातील जुनी मातीची घरे आहेत, त्यात पाणी मुरूम घरांच्या भिंती पडण्याचे सत्र सुरू आहे. दोन्ही तालुक्यामध्ये आतापर्यंत १७ घरे पडल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. अजूनही घरांच्या पडझडीचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे त्या-त्या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या निवाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
पुराचा ‘या’ गावांना धोका
कराड आणि पाटण तालुक्यात कृष्णा, कोयना, तारळी, उत्तरमांड, दक्षिणमांड आणि वांग अशा नद्या आहेत. या नदी पात्रालगत एकूण ३७ गावे आहेत. यामध्ये कराड, सयापूर, रेठरे बुद्धक, खुबी, यारुंजी. गोटे, शेरे, दुशेरे, गोंदी, कापिल, पाचवडवस्ती, रेठरे खुर्द, खोडशी, आटके, गोळेश्वर, कार्ये, शिवडे, जाधवमळा, मालखेड, कोडोली, तांबवे, वारुंजी, म्होप्रे, येरवळे, चचेगाव, वडगाव उ., पाल, हिंगनोळे, खालकरवाडी, चरेगाव, काले, वाठार, नांदगाव, उंडाळे, पोतले, येणके, आणे, कोळे या गावाचा समावेश आहे.
पुरामुळे लगेच संपर्क तुटणारी गावे
पावसाळ्यात कोयना आणि कृष्णा नद्यांना पूर आल्यास लगेच संपर्क तुटणारी गावे ही पाच आहेत. यामध्ये बवे, आटके, जाधवमळा, दुशेरे आणि आणे या गावांचा समावेश आहे.
पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांची ३७ संख्या
कोयना नदीकाठ : ०५, कृष्णा नदीकाठ : १९, तारळी नदीकाठ : ०३, उत्तरमांड : ०२, दक्षिणमांड : ४, वांग नदीकाठ : ४,