कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात लम्पीचा चांगलाच फैलाव होऊ लागला आहे. जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव अकरा पैकी सुमारे आठ तालुक्यात झाला आहे. यामध्ये कराड तालुक्यात सर्वाधिक धोका आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 350 जनावरे बाधित झाली असून यामधील 26 जनावरांचा मृत्यू झालेला आहे.
मागीलवर्षी आॅक्टोबर ते २०२३ मधील मार्चपर्यंतच्या लम्पीच्या पहिल्या लाटेत सुमारे २० हजारांवर जनावरांना चर्मरोगाने गाठले होते. तर १ हजार ४८० जनावरांचा मृत्यू झाला होता. यातून बळीराजा सावरत असतानाच जिल्ह्यात दुसरी लाट सुरू झालेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लम्पी बाधित जनावरे आढळून येत आहेत.
जिल्ह्यात बाधित आणि मृत जनावरांची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांचीही चिंता वाढलेली आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तर दिवसेंदिवस बाधित जनावरांचा आकडा वाढत चालल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.