कराड प्रतिनिधी | सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून तांत्रिक माहिती प्राप्त करुन त्यांचे तांत्रिक विश्लेषन करुन सदरचे गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेत सातारा तसेच इतर जिल्ह्यातून २५ मोबाईल हस्तगत केले. ते मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले. मोबाईल मिळाल्याने नागरिकांनी उंब्रज पोलिसांना धन्यवाद दिले.
नागरिकांचे चोरी तसेच गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी उंब्रज पोलिसांना दिले होते. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे पो. कॉ. मयुर थोरात व इतर पोलीस अंमलदार यांनी तपास केला.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले, पो. हवा संजय धुमाळ, पो. कॉ. मयुर थोरात, पो. कॉ राजकुमार कोळी, पो. कॉ. श्रीधर माने, पो. कॉ. हेमंत पाटील, पो. कॉ. गणेश कुंदे, पो. कॉ. मधुकर मांडवे, पो. कॉ. प्रशात पवार, पो. कॉ. निलेश पवार तसेच सायबर सेलचे पो कॉ महेश पावर यांनी केली आहे.