जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे वित्त आयोगाचा 244 कोटींचा निधी शिल्लक; 31 मार्चपर्यंत खर्च करावा लागणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ग्रामस्थांकडून विविध कररूपातून पैसे जमा होतात, तसेच 15 व्या वित्त आयोगातूनही निधी मिळतो. त्यामुळे ग्रामपंचायती मालामाल होत आहेत. परिणामी गावांचे रूपडे पालटू लागले आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार ४९२ ग्रामपंचायतीं आहेत. त्यात वित्त आयोगाचा 244 कोटींचा निधी शिल्लक आहे. हा निधी 31 मार्चपर्यंत खर्च करावा लागणार आहे.

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आता १५ व्या वित्त आयोगातून लोकसंख्येच्या प्रमाणात लाखो रुपयांचा निधी प्राप्त होत आहे. यामधून गावागावांत विकासाची गंगा वाहत आहे. केंद्राच्या १५ व्या वित्त आयोग निधीतून ग्रामपंचायतींना निधी मिळतो. यासाठी वार्षिक आराखडा तयार करावा लागतो. त्याशिवाय निधी खर्च करता येत नाही. यामध्ये ग्रामपंचायती अंतर्गत विविध खर्च कामांसाठी ८० टक्के निधी मिळतो. तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी १० टक्के निधी वैध प्राप्त होतो. २०२० पासून हा निधी मिळत आहे.

ग्रामपंचायतींच्या खात्यावर ५१६ कोटी ६४ लाख जमा

जिल्ह्यात १ हजार ४९२ ग्रामपंचायती आहेत. आतापर्यंत विविध हप्त्यांनुसार या ग्रामपंचायतींच्या बँक खात्यावर ५१६ कोटी ६४ लाख ३० हजार १६५ रुपयांचा निधी जमा झालेला आहे. हा सर्व निधी खर्च करावा लागणार आहे.

जिल्ह्यात १४९२ ग्रामपंचायती…

जिल्ह्यात एकूण १ हजार ४९२ ग्रामपंचायती आहेत. यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या पाटण तालुक्यात २३४ आहेत, तर कराड तालुक्यात २००, सातारा १९१, कोरेगाव तालुका १४२, खटाव १३३, फलटण १२८, जावळी १२५, वाई तालुका ९९, माण ९५, महाबळेश्वर तालुका ७९ आणि खंडाळा तालुक्यात ६३ ग्रामपंचायती आहेत.