सातारा जिल्हा परिषद नोकर भरती; 244 उमेदवारांना नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने (Satara Zilla Parishad Recruitment) अनेकवेळा विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येते. नुकतीच जिल्हा परिषदेत विविध 21 संवर्गांतील 972 पदांसाठी परीक्षा पार पडली. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांपैकी आतापर्यंत 16 संवर्गांतील 244 उमेदवारांना समुपदेशनाने नियुक्ती देण्यात आलेली आहे. उर्वरित संवर्गांतीलही पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्ती मिळणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेकडील विविध 21 संवर्गांत 972 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी 74 हजार 578 उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी १५ ऑक्टोबरपासून ऑनलाइन पद्धतीने सर्व 21 संवर्गांसाठी परीक्षा झाली. त्यानंतर निकालही प्राप्त झाला. यामधील 16 संवर्गांतील उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशनाच्या वतीने पदस्थापना आणि नियुक्तीचा आदेश देण्यात आला आहे. आता 6 संवर्गाची प्रक्रिया बाकी राहिलेली असून उर्वरित संवर्गांत आरोग्यसेवक पुरुष 40 टक्के, कंत्राटी ग्रामसेवक यामधील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे.

नियुक्ती आदेश कार्यवाही अंतिम टप्प्यात असून कनिष्ठ लेखाधिकारी, आरोग्यसेवक (महिला), आरोग्यसेवक (पुरुष) 50 टक्के अशा तीन संवर्गांतील कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पौर्ण करण्यात आलेली आहे. अंतिम निवड यादीबाबत शासनस्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे.