सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील २४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदी सेवा निवृत्तीच्या लाभाचे वितरण गुरुवारी करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्या हस्ते निवृत्तीच्या लाभाचे वाटप करण्यात आले.
सातारा जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आनंदी सेवा निवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, सामान्य प्रशासनसह अन्य विभागातील 24 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या लाभाचे आदेश देण्यात आले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, लेखाधिकारी आर.डी. सादिगले व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग दक्षिणमधील शशिकांत कांबळे यांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला. कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागात 38 वर्षे सेवा बजावली आहे.