सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बोधेगावच्या हद्दीत एका हॉटेलवर थांबलेल्या ट्रॅव्हल्समधून तब्बल 22 लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच घडली. या याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आली. तसेच सीसीटिव्ही फुटेज तपासणीसह इतर माहिती घेण्याचे पोलिसांकडून काम केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सकाळी 7:30 ते 8:30 वाजण्याच्या सुमारास वाई तालुक्यातील बोपेगाव गावच्या हद्दीत असलेल्या कोहिनूर हॉटेलच्या आवारात व्हीआरएल ट्रॅव्हल्स क्रमांक KA 25 D 4863 थांबली होती. त्यातील प्रवाशी नरेंद्र प्रल्हादसिंह गिरासे (वय 42) हे बस चहा नाष्टा करण्यासाठी थांबल्यावर ते खाली उतरून बाथरूमला गेले होते. बाथरूमला जायच्या आधी त्यांच्या जवळ 2 लाखांची रोख रक्कम असणारी काळ्या रंगाची बॅग त्यांनी ट्रॅव्हल्स मध्येच ठेवली होती.
नरेंद्र गिरासे लगेच परत ट्रॅव्हल्समध्ये आले तेव्हा त्यांच्या जवळ असणारी काळ्या रंगाची बॅग व त्यामध्ये ठेवलेले सुवर्णा बिल्डकॉन कंपनीच्या मशीनरी विक्रीचे असलेले 22 लाख रुपयांची रक्कम पहिली असता त्यांना ती मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले याची माहिती त्यांनी बस चालवला दिली. चालकाने संपूर्ण बसची तपासणी केली असता बॅग मिळुन आली नाही.
त्यानंतर या घटनेची माहिती भुईंज पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी देखील संपूर्ण बसची तपासणी केली असता बॅग मिळुन न आल्याने अखेर प्रवाशी नरेंद्र गिरासे यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भुईज पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे. याचा अधिक तपास वाईचे DYSP बाळासाहेब भालचीम, सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांच्यासह भुईज पोलिस पोलिस ठाण्यातील डिबी विभागाचे पोलिस कर्मचारी करत आहेत.