सातारा लोकसभेच्या अर्ज छाननीमध्ये 21 वैध तर 3 नामनिर्देशनपत्र अवैध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । 45 सातारा लोकसभेसाठी एकूण 24 उमेदवारांनी 33 नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. आज झालेल्या छाननीमध्ये 21 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध तर 3 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

सातारा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी बहुजन समाज पार्टीचे आनंद रमेश थोरवडे, भाजपचे उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र पवार) पक्ष शशिकांत शिंदे, वंचित बहुजन आघाडी प्रशांत रघुनाथ कदम, बहुजन मुक्ति पार्टी तुषार विजय मोतलिंग, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) दादासाहेब वसंतराव ओव्हाळ, भारतीय जवान किसान पार्टी दिलीप हरिभाऊ बर्गे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सयाजी गणपत वाघमारे, अपक्ष डॉ. अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले, अपक्ष सुरेशराव दिनकर कोरडे, संजय कोंडीबा गाडे अपक्ष, चंद्रकांत जाणू कांबळे अपक्ष, निवृत्ती केरु शिंदे अपक्ष, प्रतिभा शेलार अपक्ष, सदाशिव साहेबराव बागल अपक्ष, मारुती धोंडीराम जानकर अपक्ष, विठ्ठल सखाराम कदम अपक्ष, विश्वजीत पाटील-उंडाळकर अपक्ष, सचिन सुभाष महाजन अपक्ष, सागर शरद भिसे अपक्ष, सीमा सुनिल पोतदार अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

आज अर्ज छाननीमध्ये ३ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले. दरम्यान, अर्ज मागे घेण्याची मुदत दि. २२ एप्रिलपर्यंत आहे. अर्ज माघारीनंतर उमेदवारीच्या लढतीचे चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार आहार. दरम्यान, इच्छुक उमेदवारांकडून रात्रीचा दिवस करत प्रचार केला जात आहे.