कराड प्रतिनिधी । नेहमीच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर बारकाईने लक्ष देणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदारसंघातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यासाठी शिफारस केली होती. आ. चव्हाण यांच्या शिफारशीनुसार २१ लाख १५ हजार रुपयांची गरजूंना मदत मिळाली आहे. मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई येथून याबाबतचे पत्र आ. चव्हाण यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.
सदरच्या पत्रात म्हंटले आहे की, १ जुलै २०२२ ते १ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत व्हावी. अशी शिफारस असणारे पत्र मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना आ. चव्हाण यांना दिले होते. गरजू रुग्णांची यादी व त्याप्रमाणे २१ लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आ. चव्हाण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहेत. त्यांनी गावोगावी विकासाचा निधी पोहचवत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवली आहे. विकासाबरोबर ते मतदरसंघातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याकडे गतवर्षी गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत व्हावी, याकरिता विनंती केली होती. सदरच्या गरजू रुग्णांची यादी जोडत आ. चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीसाठी शिफारस केली होती. यावर नुकतेच ना. शिंदे यांनी २१ लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याचे आ. चव्हाण यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. हा निधी प्राप्त झाल्याने गरजूंना मोलाची मदत होणार आहे.
पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात ‘या’ महत्वाच्या योजनेची मुहूर्तमेळ रोवली
आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, टोल फ्री १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू करण्याची योजनांची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयाची या निमित्ताने आठवण झाल्याचे सांगता येईल.