सातारा प्रतिनिधी । फलटण आगाराच्या वाहतूक व्यवस्थेत नवीन वळण घालण्याची तयारी सुरू आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत नुकत्याच दहा नवीन एस.टी. बसेस लोकार्पित झाल्या आहेत. या नवीन बसेस मुंबई परेल, बोरिवली, मलकापूर आणि स्थानिक ठिकाणी चालवल्या जाणार आहेत. त्याचबरोबर, फलटण आगारासाठी २१ इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्या असून, त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनच्या कामासाठी ‘वर्क ऑर्डर’ निघाली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
फलटण आगारात सध्या ९० बसेस आहेत, पण एकूण १०५ बसेसची गरज आहे. मार्च महिन्यात काही जुन्या बसेस स्क्रॅपमध्ये जाणार असल्याने नवीन बसेस दाखल झाल्यानंतरही बसची कमतरता जाणवणार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणखी बसेसची गरज पडणार आहे.
या प्रक्रियेत सर्व स्तरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. मुदत संपलेल्या बसेस स्क्रॅपमध्ये जात असल्याने नवीन बस दाखल होणार आहेत. तरी देखिलवडती प्रवाशांची संख्या पाहता जादा बसेस मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे आवश्यक आहे.