सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील कोतवाल पद रिक्त सजाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, सातारा तहसीलदार राजेश जाधव, सदस्य पोपट कोकरे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत करण्यात आली. यावेळी शाळकरी विद्यार्थिनीच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण सोडत काढण्यात आली.
यावेळी सातारा- खुला प्रवर्ग, दरे बु.- खुला प्रवर्ग, कुसवडे- खुला महिला, आंबवडे खु.-अनुसुचित जमाती, आंबवडे बु- खुला प्रवर्ग, करंडी- खुला प्रवर्ग, ठोसेघर- खुला प्रवर्ग, कामथी तर्फे सातारा- खुला प्रवर्ग, कामथी तर्फ परळी- खुला प्रवर्ग, वर्ये- इतर मागास वर्ग, गोवे- खुला प्रवर्ग , कण्हेर- ईडब्लुएस महिला, नुने- ईडब्लुएस, आष्टे-अनुसुचित जमाती, वडगांव- इतर मागासवर्ग महिला, कोडोली- खुला महिला, निनाम- खुला महिला, पाटखळ- खुला प्रवर्ग, शिवथर- खुला महिला, उपरोक्त प्रमाणे 20 सजासाठी अंतिम कोतवाल आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
तसेच उर्वरित 5 सजे भाटमरळी, परळी, आलवडी , काशिल, व अतीत हे सजे आरक्षण सोडतीच्या कोणत्याही टप्यात चिठठी मधून आलेले नाहीत. त्यामुळे सदर सजे आरक्षणासाठी विचारात घेण्यात आले नाहीत, अशी माहिती कोतवाल निवड समिती सदस्य सचिव तथा तहसिलदार राजेश जाधव यांच्या वतीने देण्यात आली.