गावठी कट्टा अन् काडतुसासह 2 तरुणांना LCB कडून अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील उंब्रज येथे मसूर फाट्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी एक धाडसी कारवाई केली आहे. या ठिकाणी विक्रीकरण्याच्या उद्देश्याने घेऊन आलेला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह दोन तरुणांना पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

सुदर्शन किरण पाटील (वय 19, रा. आटके, ता. कराड) व मिथीलेश मारुती महिंदकर (वय 19, रा. मलकापूर, ता. कराड) अशी अटक केलेल्या संशियताची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक तयार करुन त्यांना अवैध शस्त्रांबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना शनिवार, दि.१८ नोव्हेंबर रोजी दोन युवक उंब्रज येथील मसूर फाटा परिसरात बेकायदेशीर गावठी कट्टयाची विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर देवकर यांनी सदर मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांचे पथकास संबंधित ठिकाणी सापळा रचून इसमांना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या.

त्यावरून पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांच्या पोलीस पथकाने मसूर फाटा येथे सापळा शनिवारी सापळा रचला. या परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना दोघेजण आढळले. त्यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता एकाच्या ताब्यात एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकुण ४० हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. संबंधित दोघेजण गावठी कट्टा विक्री करीता घेऊन आल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरुध्द उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत दोघांनाही पोलिसांनी अटक करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, लैलेश फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, सचिन साळुंखे, सनी आवटे, अरुण पाटील, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, गणेश कापरे, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, प्रविण पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, केतन शिंदे, वैभव सावंत, संकेत निकम, शिवाजी गुरव, पंकज बेसके सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे यांच्या पथकाने केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.