पाचगणीत घरफोडीसह चोरी करणारे संशयित जेरबंद; वाहनांसह 2 लाख 44 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | घरफोडी व चोरी करणाऱ्या संशयितांना जेरबंद करुन पाचगणी पोलीसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेली वाहने व इतर मुद्देमाल जप्त केला. पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत नवीन बांधकाम सुरु असलेल्या व बंद बंगल्यांचे फिटींगमधील वायर काढुन घेण्याबाबत घरफोडी व चोरीसारखे गुन्हे दाखल होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत नवीन बांधकाम सुरु असलेल्या व बंद बंगल्यांचे फिटींगमधील वायर काढुन घेण्याबाबत घरफोडी व चोरीच्या ghtna घडल्या होत्या. या घटनांबाबत पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यांच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपअधीक्षक बाळासाहेब भालचीम यांच्या सूचनांप्रमाणे पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व तपासी अंमलदार पवार व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार शिंदे व लोखंडे यांनी या गुन्हयाबाबत माहिती मिळवून ओकार संतोष राजपुरे, विशाल सुरेश आडागळे, सागर निलेश वैराट, दीपक नथुराम गोळे, ऋषी वाडकर हे संशयित निष्पन्न केले.

घरफोडी व चोरी करताना वापलेली वाहने जप्त करुन २ लाख ४४ हजार ९०० रुपयांचा एकूण मुद्देमाल हस्तगत केला. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक ननवरे, हवालदार पवार, शिंदे व लोखंडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.