शॉर्टसर्किटमुळे कोरेगावमध्ये 2 दुकाने जळून खाक; साडेतीन लाखांचे नुकसान

0
498
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर मार्केट यार्ड परिसरात गुरुवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे दोन दुकानांना आग लागली. यामध्ये दोन्ही दुकानातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या आगीत साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर मार्केट यार्ड परिसरात योगेश पडवळ यांचे रेडियम नंबर प्लेटचे तर त्याच्या शेजारी जमीर कडकडी यांचे बॅटरीचे दुकान आहे. मध्यरात्री दोन वीज वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाले. याच्या ठिणग्या वैष्णवी आटर्स या दुकानात पडल्या.

त्यानंतर काही वेळातच आग लागली. या आगीची धग शेजारच्या दुकानाला लागली. यामध्ये दोन्ही दुकाने खाक झाली आहेत. आग लागल्याचे समजताच माजी नगरसेवक नितीन ओसवाल यांच्यासह नागरिक, व्यापार्‍यांनी प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच याची माहिती रहिमतपूर पालिकेच्या अग्निशामक दलाला दिली. अग्निशामक दल दाखल झाल्यानंतर काही तासाने ही आग आटोक्यात आली.