कराडात तडीपार गुंडाकडून देशी बनावटीच्या 2 पिस्तूल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने कराड शहरात रेकॉर्डवरील तडीपार गुंडाकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल, दोन मॅक्झिन व दोन जिवंत काढतूससह एक मोटरसायकल असा 2 लाख 20 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील भेदा चौक परिसरामध्ये कराड शहर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गुन्हेगार निशिकांत शिंदे हा बेकायदेशीररित्या अवैध शस्त्र विक्री करणे करीता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सहा. पोलीस निरीक्षक रोहित फाणे यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन त्यांना मिळाले बातमीचा आशय सांगुन सदर ठिकाणी जावुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक रोहित फाणे यांचे पथकाने कराड शहरामध्ये जावुन भेदा चौकात सापळा लावला.

दरम्यान, सदर ठिकाणी मिळाले बातमीतील इसम हा त्याचेकडील मोटार सायकल वरुन येत असताना दिसला. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास शिताफीने पकडुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात 1,40,000/- रुपये किंमतीची दोन देशी बनावटीची पिस्टल, दोन मोकळया मॅग्झीन, दोन जिवंत काडतुसे व एक मोटार सायकल मिळुन आल्याने त्याचे विरुध्द कराड शहर पोलीस ठाणे येथे गुरनं. 1436/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे.