ओगलेवाडीत सापडली 2 पिस्तुले अन् 5 मॅक्झिनसह 3 जिवंत काडतुसे; तिघे संशयित ताब्यात

0
1737
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील ओगलेवाडी येथे पिस्तूल घेऊन फिरणार्‍या तिघा संशयितांना पकडण्यात सातारा गुन्हे अन्वेषण विभागास यश आले आहे. संशयितांकडून २ पिस्तूल, ५ मॅक्झिनसह तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, तन्वीर अली पटेल ( वय 32, रा. वाघेरी, ता. कराड), ओंकार रामचंद्र साळुंखे ( वय 21, रा. ओगलेवाडी) व जिशान समशुद्दीन मुलानी (वय 27, रा. हजारमा) अशी संशयितांची नावे आहेत. ओगलेवाडी परिसरात तन्वीर पटेल, ओंकार साळुंखे आणि जिशान मुलाणी हे तिघे देशी बनावटीची पिस्टले घेऊन वावरत असल्याची माहिती सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोमवारी दुपारी ओगलेवाडी येथे सापळा रचला. त्यावेळी तन्वीर पटेल, ओंकार साळुंखे व जिशान मुलाणी हे तिघे संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता तिघांकडे दोन देशी बनावटीची पिस्टले, पाच मॅक्झिन व तीन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल मिळून आला. घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, या प्रकरणी तिघा संशयितांच्या साथीदारांकडे चौकशी सुरू होती. त्यामुळे संशयितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.