पुणे-सातारा महामार्गावर कार-कंटेनरची धडक; भीषण अपघातात 2 जण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावर कर आणि कंटेनरच्या भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबईवरून मूळगावी कोल्हापूरकडे जाणाऱ्या कारला पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने धडक दिल्याने कार मधील दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात साडेतीन वर्षाची मुलीसह तिचे वडील किरकोळ जखमी झाले आहे. या अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावर चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सर्जेराव सखाराम पाटील वय ६०, ( पत्नी ) बायक्का सर्जेराव पाटील व ५०, ( मुलगा ) प्रवीण सखाराम पाटील वय ३५, ( नात ) इरा पाटील वय साडेतीन वर्ष (सर्व रा. दरेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी कारमध्ये जखमी असलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – सातारा महामार्गावरून चेलाडी उड्डाणपूल पास केल्यानंतर साताऱ्याच्या दिशेने जाणारी कार क्र एम. एच ०९ जी. यू. ०३३४ जात असताना पाठीमागून येणारा औषधाने भरलेला भरधाव कंटेनर क्र. एम. एच ४६ बी. यु १८६३ वरील चालकाचे नियंत्रण सुटून कारला धडक देत थेट महामार्गावरील पुलाच्या मधोमध जाऊन कंटेनर लटकला आहे.

घटनास्थळी राजगड पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमीना सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर महामार्गावर एक पदरी लेन निर्माण झाल्याने देगाव फाटा ते वरवेपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.