पुणे – सातारा मार्गावर ST बसची कंटेनरला धडक; अपघातात 2 प्रवाशी जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुणे – सातारा मार्गावर शिरवळजवळ एसटी आणि कंटेनरची भीषण धडक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर आली आहे.

याबाबत घटनास्थळावरून व महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी सकाळी पुण्याच्या दिशेने एक कंटेनर येत होता. यावेळी कंटेनरला एका एसटी बसने पाठीमागून जोराची धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती की या धडकेत एसटी बस उलटली. याचवेळी पाठीमागून आलेल्या कंटेनर व शिवशाही बसचीही एसटी बस व कंटेनरला धडक बसली. सुरुवातीला बस उलटल्यामुळे बसमधील 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावेळी एक कार देखील कंटेनरला मागून धडकली. मात्र, कारमधील प्रवासी सुरक्षित आहेत.

अपघात घडल्यानंतर या ठिकाणी नागरिकांनी एकच गर्दी केली. तसेच अपघातातील जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, सातारा रस्त्यावर या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.