सातारा प्रतिनिधी | मेणवली, ता. वाई येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज), निखील मोरे, अभिजित शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वाई) यांच्यावर वाई न्यायालयातच गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या राजेश नवघने याला जागेवरच ताब्यात घेतले. यानंतर या गुन्ह्यातील आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 2 पिष्टल, २ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
शरदराव रविंद्र पवार (रा. बावधन नाका, वाई. ता. वाई) व विजय लक्ष्मण अंकोशी (रा. काशीकापडी झोपडपट्टी, वाई, ता. वाई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाणे गु.र.नं.४७५/२०२३ भा.द.वि.स.कलम ३८५.३८६,३८७ वगैरे प्रमाणे दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईज, ता. वाई) व अभिजीत शिवाजी मोरे, निखील शिवाजीक मोरे (दोघे रा. गंगापुरी, वाई, ता. वाई) यांना कळंबा कारागृहातून ताब्यात घेतले होते. त्यांना वाई येथील न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असताना दि.०७/०८/२०२३ रोजी न्यायालयाच्या कक्षाबाहेर वकिलाचे वेश्यामध्ये आलेल्या फिर्यादी राजेश चंद्रकांत नवघणे (रा. मेणवली, ता. वाई) याने फाईलमध्ये लपवुन आणलेल्या पिस्टल मधुन आरोपींच्या दिशेने दोन काडतुसे फायर केली. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ राजेश चंद्रकांत नवघणे याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून चार जिवंत काडतुसासह पिस्टल ताब्यात घेतले.
सदरबाबत राजेश नवघणे याच्यावर वाई पोलीस ठाणे गु.र.नं. ५९२ / २०२३ भा.द.वि.स. कलम ३०७,१०९.३४ शस्त्र अधिनियम ३ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाई पोलीस ठाणे गु.र.नं.५९२/२०२३ गुन्हयाचा तपास वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी कमलेश मीना यांनी तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण करण्याचे आदेश तपास पथकातील पोलीस अधिकारी, पोलीस उप निरीक्षक श्री सुधिर वाळुंज, पोलीस अंमलदार पो.कॉ. श्रावण राठोड, पो.कॉ. हेमंत शिंदे, पो. कॉ प्रसाद दुदुस्कर, पो. कॉ. प्रेमजित शिर्के, पो.कॉ. राम कोळी यांना देवुन, त्यांचे आधारे आरोपी राजेश चंद्रकांत नवघणे याने त्याचा साथीदार शरदराव रविंद्र पवार (रा. बावधन नाका, वाई. ता. वाई) व विजय लक्ष्मण अंकोशी (रा. काशीकापडी झोपडपट्टी, वाई, ता. वाई) यांनी मिळून केला असल्याचे कबूल केले.
वाई गोळीबार प्रकरणातील आणखी 2 आरोपींना अटक; पिस्टलसह जिवंत काडतुसे केली जप्त pic.twitter.com/J2ghkaS2FQ
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 13, 2023
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी कमलेश मीना, परि. सहा. पोलीस अधीक्षक, पोलीस उप निरीक्षक सुधीर वाळुंज, पोलीस अंमलदार बिपीन चव्हाण, पो. हवा. शिर्के, भोईर, पो.कॉ. मंगेश जाधव, पो. कॉ. श्रावण राठोड, पो.कॉ. हेमंत शिंदे, पो.कॉ. प्रसाद दुदुस्कर, पो.कॉ प्रेमजित शिर्के, पो.कॉ. राम कोळी, पो.कॉ. गोरख दाभाडे यांनी केली आहे.
गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी केला होता सराव
वाई येथील गोळीबार करणाऱ्या घटने प्रकरणी पोलिसांनी एकास यापूर्वी अटक केली आहे. दरम्यान, यातील त्याच्या आणखी दोन साथीदाराशी अटक केली आहे. त्यांनी गोळीबार करण्यापूर्वी सराव केला असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. गुन्हा करण्याकामी मध्यप्रदेश येथून तीन पिष्टल व १२ जिवंत काडतुसे आणून त्यांनी रायरेश्वरच्या डोंगरामध्ये ४ जिवंत काडतुसे झाडुन फायरींगचा सराव केला असल्याचे आरोपींनी कबुल केले. यातील शरदराव रविंद्र पवार यास वाई मधुन ताब्यात घेण्यात आले व त्याच्याकडे तपास करता त्याने १ पिष्टल, २ जिवंत काडतुसे, तसेच विजय लक्ष्मण अंकोशी यास भिवंडी येथुन ताब्यात घेण्यात आले व त्याचेकडे तपास करता त्याने १ पिस्टल काढुन दिली आहे.