सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच कोंबींग ऑपरेशनची कारवाई केली. यामध्ये पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून २ देशी बनावटीची पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, २ मोटार सायकल असा २ लाख २५ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक सातारा श्री. समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांनी गणेशोत्सवाचे अनुशंगाने दि.०९/०९/२०२४ रोजीचे २३.०० वा ते दि.१०/०९/२०२४ रोजीचे २ वाजण्याच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेस सातारा शहरात कोंबींग ऑपरेशन तसेच राष्ट्रीय महामार्गावर गुन्हे प्रतिबंधक पेट्रालिंग करुन पोलीस अभिलेखावरील आरोपी व अन्य संशईत इसमांना चेक करुन प्रभावी कार्यवाही करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी त्यांचे अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे व परितोष दातीर यांचे पथक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर पेट्रोलिंग करीत असताना म्हसवे गावचे हद्दीत डि. मार्ट ते वाढे फाटा जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ चे सर्व्हिसरोड वरील म्हसवे गावाकडे जाणारे पुलाचेखाली पोलीस अभिलेखावरील आरोपी प्रथमेश उर्फ टॉम बाळासाहेब जगताप, (रा.वर्ये, ता.जि.सातारा) व २ अनोळखी इसम उभे असल्याचे दिसले. पोलीसांचे वाहन दिसताच त्यापैकी २ इसम अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. एका इसमास पथकातील पोलीसांनी शिताफिने पकडून त्याची अंगझडती घेतली.
त्यावेळी त्याचे कब्जात १ लाख ४० हजार रुपये किमतीची २ देशी बनावटीची पिस्टल, सहाशे रुपये किमतीचे ३ जिवंत काडतुसे व 85 हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकल मिळून आल्याने त्यांचे विरुध्द सातारा तालूका पोलीस ठाणे गु.र.नं.३६३/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम (सुधारीत २०१९) चे कलम ३, २५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, नोव्हेंबर २०२२ पासून ९५ देशी बनावटीची पिस्टल, ४ बारा बोअर रायफल, २२१ जिवंत काडतुसे व ३७७ रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा व अपर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती डॉ. वैशाली कडुकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणें, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, अमोल माने, प्रविण कांबळे, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, स्वप्नील कुंभार, अजित कर्णे, गणेश कापरे, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, केतन शिंदे, स्वप्नील दौंड, प्रविण पवार, प्रिती पोतेकर, शिवाजी गुरव, अमृत कर्पे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.