सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयामध्ये फलटण तालुक्यातील फलटण ग्रमिण पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळी प्रमुखांवर सातारा पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली.
१) किरण रमेश आवारे, (वय २०, रा. बिची, ता. फलटण, जि. सातारा) २) कुमार लालासो काकडे, (वय २१, रा. बिबी, ता. फलटण, जि. सातारा) अशी कारवाई करण्यात आल्याची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संबंधित ज्या दोघा टोळीप्रमुखांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे त्यांच्या विरुद्ध जबरी चोरी करणे, दरोड्याची तयारी करणे, दुखापतकरून शिविगाळ दमदाटी करून विनयभंग करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे फलटण ग्रामिण पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक श्री. सुनिल महाडीक यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पुर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी फलटणश्री. राहुल आर. धस यांनी केली होती.
टोळीमधील इसमांना दाखल असले गुन्हयांमध्ये त्यांचेवर कायदेशीर कारवाई करुनही ते जामीनावर बाहेर आल्यानंतर वेळोवेळी त्यांचेवर अटक, प्रतिबंधक कारवाईचा कोणताही परिणाम त्यांचेवर झाला नाही अगर त्यांचे गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा झाली नसुन ते सातत्याने गुन्हे करीत होते तसेच त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्याने त्यांचा लोकांना फार मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता, अशा इसमांवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
वरील टोळीस पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे समोर सुनावणी होऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पूर्ण सातारा जिल्हयातुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे. नोव्हेंबर २०२२ पासुन म.पो.का. कलम ५५ प्रमाणे १९ उपद्रवी टोळयांमधील ६३ इसमांना, म.पो.का.कलम ५६ प्रमाणे १७ इसमांना व म.पो.का. कलम ५७ प्रमाणे ०२ इसमांना असे एकुण ८२ इसमांचे विरुध्द तडीपार सारखी कारवाई करण्यात आले आहे. भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने, पो.हवा. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ.अनुराधा सणस, फलटण ग्रामिण पोलीस ठाणेचे पो. हवा. वैभव सूर्यवंशी, पो.ना. श्रीनाथ कदम यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.