कराड प्रतिनिधी । सध्या महाबळेश्वर, पाटण तालुक्यात पाऊस कोसळत असल्यामुळे या ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहत आहेत. तसेच तलावही भरल्याने त्या ठिकाणी पर्यटकांकडून गर्दी केली जात आहे. मात्र, पावसाळ्यात दरडी कोसळणे, भेगा पडणे आदी घटना घडत आहेत. अशीच घटना बुधवारी सकाळी घडली. साताऱ्याच्या कास पठाराकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला मधोमध भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून सकाळी जात असलेल्या दोन एसटी तशाच अडकुणी पडल्या आहेत. या ठिकाणचा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कास पठाराच्या कुशीत घनदाट वनराईत आदीमाया आदीशक्ती श्री घाटाई देवीचे मंदिर आहे. कासकडे जाणारा हा घाटाई रोड वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. या ठिकाणी जाण्यासाठी कास बामणोली मार्गे जावे लागते. या ठिकाणी घाटाईदेवी मार्गे कास बामणोली हि एसटी बस आज सकाळी निघाली होती. हि बस चिखलात अडकली. तसेच या ठिकाणापासून का अंतरावर रस्त्याला भेगा पडल्यामुळे वाहतूकही थांबवण्यात आली आहे.
या मार्गावरील रस्त्यावर भेगा पडल्यामुळे दोन एसटी बस तसेच काही वाहने अडकून पडली आहेत. याशिवाय कारण कास धरण भरल्यामुळे रस्त्यावर पाणी आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात चिखलही निर्माण झाल्याने वाहने चखलात अडकून पडत आहेत. त्यामुळे या मार्गाचा हा रस्ता बंद करून घाटाई मार्गे वाहतूक वळवण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणीच्या मार्गावरही काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत.