सातारा पोलिसांकडून 170 सराईत तडीपार; विधानसभेच्या मतदानास उपस्थित राहता येणार

0
11
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारला जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलिस अलर्ट झाले आहे. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून १७० सराईत गुन्हेगारांना १७ ते २४ नोव्हेंबर दरम्यान तडीपार केले आहे. तर ६६८ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, सातारा शहर पोलिस ठाणे हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांना विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. यासाठी २० नोव्हेंबर या मतदानादिवशी सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत केंद्रावर मतदान करण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्यास मुभा देण्यात आलेली आहे.

विधानसभेची निवडणूक निर्भयपणे पार पाडण्यासाठी पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांनी गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक विधानसभा मतदारसंघाचा काही भाग येतो. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्याने सातारा शहर पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारांकडून गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची शक्यता होती. तसेच कार्यकारी दंडाधिकारी तथा सातारा तहसीलदार यांच्या आदेशान्वये पोलिस ठाणे हद्दीतील १७० सराईत गुन्हेगारांना १७ ते २४ नोव्हेंबरदरम्यान सातारा जिल्हा आणि परिसरातून तडीपार करण्यात आलेले आहे.

तसेच कारवाई केली आहे. आतापर्यंत हजार २६६ लीटर अवैध दारू पकडून १५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच २०५ किलो अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत ४ लाख ९५ हजार रुपये आहे. त्याचबरोबर अमली पदार्थ सेवन करणाऱ्या पाच जणांवरही कारवाई करण्यात आलेली आहे.