रणदुल्लाबादमधील 17 वर्षीय विद्यार्थ्यांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद येथील एका १७ वर्षीय बारावीतील विद्यार्थ्यांचा डेंग्यूसदृश आजाराने सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. अथर्व हणमंत जगताप असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे.

याबाबट अधिक माहिती अशी की, गावातील हणमंत जगताप यांच्या घराजवळ सांडपाणी तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून अथर्व हा थंडी – तापाने फणफणला होता. त्याला जास्त त्रास साताऱ्यातील दवाखान्यात हलवण्यात आले होते. डेंग्यूसदृश आजारामुळे गेल्या चार दिवसांपासून अथर्व कोमात गेला होता.

उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. दुपारी त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार ‘करण्यात आले. दरम्यान, आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून डेंग्यूसदृश्य साथीला आटोक्यात आणण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.