सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील पळशी येथील एका १७ वर्षीय तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना पळशी माळीखोरा शिवारात घडली. अदिती धनाजी देवकुळे (वय 17, रा. पळशी माळीखोरा) असे मृत तरुणीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार, दि. 9 जून 2025 रोजी सकाळी ७ वाजता पळशी येथील माळीखोरा येथील भोगल्याचे शिवारात असलेल्या विहिरीत अदिती धनाजी देवकुळे ही विहीरीतील पाण्यात पडुन बुडुन मृत झाली आहे, अशी तक्रार महादेव धर्मा देवकुळे (रा.पळशी) यांनी म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार डी. पी. खाडे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून म्हसवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पोलीस हवालदार डी. पी. खाडे करत आहेत.