सातारच्या लेकीनं करून दाखवलं ! 17 वर्षीय अदिती स्वामीने जागतिक चॅम्पियन स्पर्धेत मिळवलं ‘सुवर्ण पदक’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याने अनेक खेळाडू भारताला दिले. भारताला 70 वर्षांपुर्वी पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील होते. त्यांच्यानंतर ऑलम्पिक स्पर्धेसह अनेक स्पर्धांमध्ये सातारा जिल्ह्यातील काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. अशीच चमकदार आणि सुवर्णमय कामगिरी साताऱ्याची लेक आदिती स्वामी हिने करून दाखवली आहे. अदितीने अवघ्या 17 व्या वर्षात बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला संघातून अंतिम मेक्सिकोचा पराभव केला आहे. मेस्किकोचा पराभव करत तिने पहिल्यांदा सुर्वणपदक जिंकले आहे. यामध्ये या स्पर्धेत महिला संघात ज्योती सुरेखा वेन्नम, साताऱ्याची कन्या आदिती स्वामी, परनीत कौर यांचा समावेश असून त्यांनी एकप्रकारे इतिहासच घडवला आहे.

बर्लिन (जर्मनी) येथे शनिवारी जागतिक खुल्या गटातील तिरंदाजी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सातारची सुकन्या अदिती स्वामीने सुवर्णवेध साधला. आदितीने दोन महिन्यांपूर्वीच ज्यूनिअर वर्ल्ड टायटलवर निशाणा साधला होता. आता ती सीनियर चॅम्पियन देखील बनली आहे. 17 वर्षीय आदिती स्वामीने अँड्रियाला पराभूत करत सीनियर वर्ल्ड चॅम्पियनचे शीर्षक आपल्या नावावर केले आहे. जुलैमध्ये लिमेरिक येथे झालेल्या 18 वर्षांखालील यूथ चॅम्पियनशिपची स्पर्धेत अदितीने 150 गुणांपैकी 149 गुण मिळवले होते. या गुणांसह तिने मेक्सिकन खेळाडूला दोन गुणांनी मात दिली. अँड्रियाने उपांत्यपूर्व फेरीत विद्यमान चॅम्पियन सारा लोपेझला नॉकआउट केले होते.

Aditi Swamy

असा मिळवला स्पर्धेत विजय

जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात तिने सामन्याच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला पराभूत केले. आदिताने धमाकेदार सुरुवात करत तिच्या पहिल्या तीन बाणांनी मध्यभागाला बरोबर लक्ष्य केले. या अचून निशाण्यामुळे आदितीने 30-29 अशी पहिल्या फेरीत आघाडी घेतली.आदिती पहिल्या चार फेऱ्यांमध्ये सर्व 12 बाणांचा मारा करत तीन गुणांसह आघाडीवर होती. अंतिम फेरीत आदितीने तीनपैकी बाणांपैकी एक बाण लक्ष्यावर मारत 9 गुण मिळले. तिचा हा निशाणा तिला थेट वर्ल्ड चॅम्पियनकडे नेणारा ठरला. दरम्यान अदिती स्वामी, परनीत कौर आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनी महिला सांघिक अंतिम सामना जिंकला. हा सामना जिंकत त्यांनी भारताला जागतिक तिरंदाजी स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

कोण आहे आदिती स्वामी?

आदिती स्वामी हिने सातार्‍याचे नाव जागतिक पटलावर झळकविले. आहे त्यामुळे सर्व सातारकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. सातारकर आदितीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तिच्या आई-वडीलांवर देखील अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. आदितीचे वडील हे युगपुरूष शिवाजी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, कण्हेर येथे शिक्षक आहेत, तर आई ग्रामसेविका आहे. आदितीने सुवर्णपदक पटकावताच सातार्‍यातील मंगळवार पेठेसह संपुर्ण शहरात जल्लोष करण्यात आला. जुलैमध्ये लिमेरिक येथे झालेल्या 18 वर्षांखालील यूथ चॅम्पियनशिप स्पर्धेत आदितीने 150 गुणांपैकी 149 गुण मिळवले होते.