सातारा जिल्ह्यातील 17 हजार निरक्षर उद्या देणार साक्षरतेची परीक्षा

0
202
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । केंद्र‌पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत दरवर्षी असाक्षर व्यक्तींची साक्षरता, संख्याज्ञान मूल्यमापनासाठीची परीक्षा घेतली जाते. यंदाच्या वर्षी देखील हि परीक्षा घेतली जाणार आहे. उद्या रविवार दि.23 मार्च २०२५ रोजी सातारा जिल्ह्यात सकाळी १० ते ५ सायकांळी ५ वाजेपर्यंत असाक्षर व्यक्तीसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेला सातारा जिल्ह्यातून १७, २६२ असाक्षर बसणार आहेत.

ज्या शाळेतून उल्लास अॅपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे व १७ मार्च 202४ रोजी झालेल्या परीक्षेत नीड इम्प्रुमेंट असणारे असाक्षर अशा सर्वानी रविवारी होणाऱ्या परीक्षेला बसणे गरजेचे आहे. तसेच नोंदणीकृत असावर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पाडाव्यात असे आव्हान करण्यात आले आहे.

परिसंख्येसाठी लागणार ‘हि’ महत्वाची ओळखपत्रे

असाक्षर परीक्षेला जाताना शक्य असल्यास असाक्षर व्यक्तीने स्वतःचा आय कार्ड साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावावा, जन्मतारखेचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकपासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

150 गुणांची असते असाक्षर परीक्षा

प्रश्नपत्रिका पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यांच्यांशी संबंधित तीन विभागात विभागलेली असून ही परीक्षा १५० गुणांची आहे. वाचन ५० गुण, लेखन ५० गुण, संख्याज्ञान ५० गुण परीक्षा उतीर्ण होण्यासाठी १७ गुण अनिवार्य आहे यूडायस क्रमांकानुसार असाक्षराची नोंद‌णी केलेली प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र असणार आहे.

परिक्षेतील उत्तीर्ण नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्र दिले जाणार : नायकवडी

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्रशासनाकडून प्रमाणपत्र , गुणपत्रक देण्यात येणार आहे. परीक्षेला बसण्यासाठी उल्लास अँपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. परिक्षेच्या अनुषंगाने संचालक (योजना) महेश पालकर यांच्या सूचनेनुसार परिक्षेची अनुषंगाने सर्व नियोजन, तयारी वेगाने सुरु आहे. याबाबत सर्व सूचना गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, विषयक तज्ञ यांना देण्यात आल्या असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) अनिस मुसा नायकवडी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.