जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी 17 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्याच्या ग्रामविकास विभागाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेकरता सातारा जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी पायाभूत सुविधांची असणारी आवश्यकता व त्यासाठी उपलब्ध असणार्‍या स्त्रोतांची मर्यादा विचारात घेवून योजनेस मुदतवाढ देण्यात आली होती. ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाही अशा सातारा जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतीचे प्रस्ताव राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे पाठवण्यात आले होते.
त्यानुसार ग्रामविकास विभागाने 87 ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामास मंजुरी दिली आहे.

यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळेच 87 ग्रामपंचायतींना स्वत:च्या इमारती मंजूर झाल्या असून कोट्यवधी रूपयांचा निधीही मिळाला आहे.

अशा आहेत 87 ग्रामपंचायती…

पाटण तालुक्यातील पाठवडे, नेचल, कळंबे, शितपवाडी, कोचरेवाडी, लुगडेवाडी, सातर, हुंबरवाडी, टेळेवाडी, आंबवणे, कोडोली, नाव, किल्ले मोरगिरी, पाचगणी, पाळशी, गावडेवाडी, गोकूळ तर्फ पाटण, चौगुलेवाडी (सा), ढाणकल, रूवले. फलटण तालुक्यातील पापर्डे, नुने. महाबळेश्वर तालुक्यातील गोरोशी, हातलोट, देवसरे, बिरमणी, खंबील चोरगे, वलवण, पारूट, रामेघर, सोनाट, वारसोळीदेव, येरणे बु., पारपार, मेटतळे, वाळणे, घावरी, उंबरी, एंरडल, गोगवे. माण तालुक्यातील मणकर्णवाडी, पुकळेवाडी, पुळकोटी. वाई तालुक्यातील मुगांव, दह्याट, जोर, आकोशी, यशवंतनगर. कराड तालुक्यातील करंजोशी, गोसावेवाडी तळबीड. कोरेगाव तालुक्यातील खामकरवाडी, फडतरवाडी, तळीये, तडवळे संमत वाघोली, शिरढोण, खटाव तालुक्यातील कारंडेवाडी, धारपुडी, भादवडे. सातारा तालुक्यातील वेणेखोल, बेंडवाडी, मोरेवाडी, निगूडमाळ, पिलाणी, मस्करवाडी, वावदरे, राकुसलेवाडी, आरगडवाडी, बोपोशी, चाळकेवाडी, साबळेवाडी, बोरखळ, पेट्री आनावळे. जावली तालुक्यातील कुंभारगणी, शिंदेवाडी, आंधारी कास, मरडमुरे, पानस, म्हाते बु., केसकरवाडी, काटवली, वरोशी, राणगेघर, बामणोली कसबे, मोहाट, नांदगणे अशा 87 ग्रामपंचायतींसाठी 17 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.