सातारा लोकसभेसाठी शेवटच्या दिवशी 16 नामनिर्देशनपत्र दाखल; अर्जांची संख्या झाली 33

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । 45 सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस पार पडला. आज शेवटच्या दिवशी एकूण 16 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. तर आतापर्यंत एकूण जिल्ह्यातून 33 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.

आज शुक्रवारी शेवटच्या दिवशी वैशाली शशिकांत शिंदे (रा. ल्हासुर्णे, ता. कोरेगाव जि. सातारा नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरचंद्र पवार) पक्ष, सिमा सुनिल पोतदार (रा. पुसेसावळी, ता. खटाव जि. सातारा अपक्ष, प्रतिभा सुनिल शेलार, रा. 79, चकोर बेकरी समोर, सोमवार पेठ, सातारा अपक्ष, विठ्ठल सखाराम कदम, रा. जोर पो. वयगाव ता. वाई जि. सातारा अपक्ष, शशिकांत जयवंतराव शिंदे, रा. ल्हासुर्णे ता. कोरेगाव जि. सातारा नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरचंद्र पवार) पक्ष, प्रशांत रघुनाथ कदम, रा. वडगाव (उंब्रज) ता. कराड जि. सातारा वंचित बहुजन आघाडी पक्ष, विश्वजित अशोक पाटील, रा. उंडाळे ता. कराड जि. सातारा अपक्ष यांनी अर्ज दाखल केले.

तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले, जलमंदिर पॅलेस सातारा भाजप, मारुती धोंडीराम जानकर, रा. 14 केसकर कॉलनी, शिवनगर दरे खुर्द सातारा शहर अपक्ष, आनंदा रमेश थोरवडे, रा. 62/2 प्रभात टॉकीज परिसर बुधवार पेठ, कराड बहुजन समाज पार्टी पक्षाकडून 2 नामनिर्देशनपत्र, अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले रा, 338 गुरुवार पेठ, सातारा अपक्ष, सचिन सुभाष महाजन, रा. बुध ता. खटाव जि. सातारा अपक्ष, सदाशिव साहेबराव बागल, रा. गोवे ता.जि. सातारा अपक्ष, गणेश शिवाजी घाडगे, रा. शिबेवाडी (कुंभारगाव) ता. पाटण जि. सातारा अपक्ष, तुषार विजय मोतलिंग रा, कळंबे ता. वाई जि. सातारा बहुजन मुक्ती पार्टी पक्षाकडून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.