सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस होता. या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातून पाच उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे व महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासह एकूण 16 उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये तब्बल दहा अपक्षांचा समावेश आहे. या उमेदवारांना लागलीच निवडणूक चिन्हेही दिली गेली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
सातारा मतदारसंघात बंडखोरीसारखा कटकटीचा विषय उद्भवला नसल्यामुळे अर्ज माघारीचा विषय सातारासाठी कुतूहलाचा नव्हता. फक्त आहेत त्यामधील कोण-कोण माघार घेणार?, इतकीच उत्सुकता होती. काल अर्ज मागे घेणाऱ्यामध्ये चंद्रकांत जाणू कांबळे, दिलीप हरिभाऊ बर्गे, दादासा वसंतराव ओव्हाळ, सागर शरद भिसे, विठ्ठल सखाराम कदम यांचा समावेश आहे.
निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार व त्यांचे पक्ष याप्रमाणे
बहुजन समाज पक्ष – आनंद रमेश थोरवडे (बुधवार पेठ, कराड), वंचित बहुजन आघाडी – प्रशांत रघुनाथ कदम (वडगाव, उंब्रज, ता. कराड), बहुजन मुक्ती पार्टी – तुषार विजय मोतलिंग (कळंभे, ता. वाई), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी – सयाजी गणपत वाघमारे (तळबीड, ता. कराड)., अपक्ष उमेदवार : बिगबॉस फेम डॉ. अभिजीत वामनराव आवाडे – बिचुकले (सातारा), सुरेशराव दिनकर कोरडे (फुलेनगर, वाई), संजय कोंडीबा गाडे (कुसुंबी, ता. जावली), निवृत्ती केरू शिंदे (शाहूनगर-गोडोली, सातारा), प्रतिभा शेलार (सोमवार पेठ, सातारा), सदाशिव साहेबराव बागल (गोवे, ता. जि. सातारा), मारुती धोंडीराम जानकर (केसकर कॉलनी, सातारा), विश्वजीत पाटील-उंडाळकर (उंडाळे, ता. कराड), सचिन सुभाष महाजन (बुध, ता. खटाव), सीमा सुनील पोतदार (पुसेसावळी, ता. खटाव).