सातारा प्रतिनिधी | विनापरवाना ताडीची चोरटी विक्री करणाऱ्या खटाव तालुक्यातील चितळी येथील एकावर मायणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीकडून ५ कॅनमधील १५५ लिटर ३ हजार शंभर रुपये किमतीची ताडी जप्त करण्यात आली आहे.
अंबाती रमेश नारायण गौड (वय ४३, रा. चितळी, ता. खटाव) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चितळी गावच्या हद्दीत गौड हा राहत्या घराच्या भिंतीच्या आडोशाला विनापरवाना ताडीची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बसल्याचा आढळून आला.
दरम्यान, मायणी पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडून ५ कॅनमधील १५५ लिटर ३ हजार शंभर रुपये किमतीची ताडी मिळून आली. पोलिसांनी त्याच्यासह ताडी ताब्यात घेतली.